1. एसएनडीटी महिला विद्यापीठात ९ नोव्हेंबरला ‘नवोन्मेष महाकुंभ’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ९ नोव्हेंबरला ‘नवोन्मेष महाकुंभ’ आयोजित केला जाणार आहे.
नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात विद्यार्थिनींच्या कल्पनांना वाव देण्यासाठी, उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाकुंभाचं उद्घाटन होईल. या महाकुंभासाठी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले गेले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.