शाश्वत विकासात शिक्षणाची भूमिका यावर राष्ट्रीय परिषद 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई 

शिक्षणशास्त्र महाविद्यालय

आयोजित 

शाश्वत विकासात शिक्षणाची भूमिका यावर राष्ट्रीय परिषद 

January 6 - 7, 2024
 

एसएनडीटी महिला विद्यापीठ, पुणे परिसर येथे  शाश्वत विकासावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन- मा. पोपटराव पवार यांचे विचार ऐकण्याची संधी.

पुणे: एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई संचलित एसएनडीटी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पुणे येथे दि. ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या राष्ट्रीय परिषदेचा विषय शाश्वत विकासात शिक्षणाची भूमिका असा आहे. ही राष्ट्रीय परिषद महाराष्ट्रातील बी.एड. प्राध्यापक संघटना  (MSSTEA - Maharashtra State Secondary Teacher Educator's Association) व एसएनडीटी बी. एड. कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे . रोटरी क्लब शनिवार वाडा, पुणे व पुणे मेट्रो रोटरी क्लब हे या परिषदेचे सहभागी सदस्य आहेत.

या परिषदेचे उद्घाटन दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.  याप्रसंगी आदर्श गाव हिवरे बाजार येथील माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे बीज भाषण होणार आहे.

या व्यतिरिक्त या परिषदेमध्ये पर्यावरण अभ्यासक  प्रोफेसर गुरुदास नूलकर,  पर्यावरणवादी दिलीप कुलकर्णी, डाॕ. शैलेंद्र देवळाणकर , शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, प्रोफेसर संजीव सोनवणे, कुलगुरू य.च. म. मु. वि. नाशिक यांची भाषणे होणार आहेत.

या परिषदेसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शिक्षण तज्ज्ञ, बीएड कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक,  पीएच.डी. करणारे विद्यार्थी, शालेय शिक्षक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित रहाणार आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने शाश्वत विकासात शिक्षणाची भूमिका कशी असेल या विषयावर इत्यंभूत चर्चा होणार आहे, सहभागींच्या विचारांना व्यक्त होण्यास वाव दिला जाणार आहे. अशी माहिती परिषदेच्या संचालक व महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॕ. नलिनी पाटील यांनी दिली. 

पद्मश्री पोपटराव पवार यांचे बीज भाषण शाश्वत विकास कार्यकर्ते व शिक्षणप्रेमींना ऐकता येण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे परिसर, कर्वे रोड, पुणे येथे दि. ६ जानेवारी २०२४ रोजी मुक्त प्रवेश दिला जाणार आहे.  जास्तीतजास्त शिक्षणप्रेमी व शाश्वत विकास कार्यकत्यांनी श्री. पोपटराव पवार यांच्या व इतर वक्त्यांच्या  व्याख्यानाचा दोन दिवस लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या संयोजक प्रोफेसर संगीता शिरोडे व समन्वयक डाॕ. नेहा देव यांनी केले आहे.