श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
एसएनडीटी महिला विद्यापीठात आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
Jun 21, 2023
एसएनडीटी महिला विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, क्रिडा विभाग व कैवल्यधाम योग संस्था मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम दिनांक २१ जून २०२३, रोजी सकाळी ठिक ८ वाजता बॅडमिंटन कोर्ट आणि पाटकर सभागृह, चर्चगेट आवार येथे पार पाडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रोफेसर उज्वला चक्रदेव यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर हे देखील उपस्थित होते. आंतराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयुष मंत्रालय , नवी दिल्ली यांनी दिलेली आसनांची प्रत्याक्षित विद्यार्थीनीकडून करून घेण्यात आली.
पाटकर सभागृहामध्ये खुर्चीतील योगासने (Chair Yoga) ची देखील प्रात्याक्षिके विद्यार्थींकडून करून घेण्यात आली.
योगा प्रात्यक्षिकासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये अंदाजे ६०० हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यापीठामार्फत ‘योग साप्ताह’ दिनांक १९ जून ते २७ जून २०२३ पर्यंत साजरा करण्यात आला. या सप्ताहादरम्यान विविध महाविद्यालयातून विद्यार्थीनीना योग प्रशिक्षण देण्यात आले. विद्यापीठाच्या चर्चगेट, जुहू, पुणे आवार तसेच सलंग्न महाविद्यालायामध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रम या सप्ताहात घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास विभागाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. नितीन.स. प्रभूतेंडोलकर, श्रीमती भिना पंड्या, क्रिडा समन्वयक, डॉ. वंदना शर्मा, प्राध्यापिका, एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एससीबी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वूमन, विभाग प्रमुख शिक्षक, तसेच शिक्षिकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी पालक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिनांक २५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजता मरीन ड्रायव्ह येथे कैवल्यधाम योग संस्था मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगा बाय द बे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
International Yoga Day 2023, SNDTWU