SNDT Women’s University
1, Nathibai Thackersey Road
Mumbai 400020
एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन कौशल्य विकास विभाग, युनाइटेड नॅशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यात सामंजस्य करार
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून एस. एन. डी. टी . महिला विद्यापीठाच्या माध्यमातून तरुणींना व महिलांना कौशल्य विकास विभाग देणार स्वयंरोजगाराच्या संधी...!
तरुणींना व महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास विभाग, युनाइटेड नॅशन डेव्हलपमेंट प्रोग्राम व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांच्यात एकत्रित रित्या आज दिनांक ०३ जानेवारी २०१७ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू, प्राध्यापिका श्रीमती शशिकला वंजारी व तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यांमार्फत एस. एन. डी. टी . महिला विद्यापीठातील तिन्ही कॅम्पस मध्ये पंतप्रधान युवा योजना यावर लक्ष केंद्रित करून कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सुविधा निर्माण केल्या जातील आणि प्रशिक्षण मिळालेल्या तरुणींना व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.