|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

Skill Development Centre, Palghar SNDTWU

श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई 

प्रस्तावित स्कील डेव्हलपमेंट सेंटर, पालघर

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि पायाभूत विकास आराखड्याचे सादरीकरण 


Jun 15, 2023

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पालघर कॅम्पसच्यावतीने पालघर येथे स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. पालघर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि पायाभूत विकास आराखड्याची संपूर्ण माहिती घेतली. हा आराखडा प्रस्तावित असून याचे सादरीकरण आज पालघर येथे विद्यापीठाच्या कुलगुरु प्रो. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले.

महिला विद्यापीठाच्या या स्कील डेव्हलपमेंट सेंटरचा पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील युवतींना जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो व या ठिकाणी त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते, अशी अपेक्षा देखील कुलगुरुंनी व्यक्त केली.

यावेळी या सेंटरसाठी पालघरमध्ये जागा उपलब्ध करुन देण्याच्या विद्यापीठाच्या प्रस्तावाचा सकारात्मक व तातडीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. पालघर मधील युवतींना या प्रस्तावित सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही सांगितले.

 

 

Skill Development Centre Palghar, SNDTWU