|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

Jaano Apna Desh

श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई 

जानो अपना देश - प्रकल्पाचा शुभारंभ

Oct 03, 2023

जानो अपना देश, प्रकल्पाचा शुभारंभ दिनांक ३ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई चर्चगेट कॅम्पस येथे पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय पर्यटनाद्वारे कला, संस्कृती, वारसा, परंपरा, वैज्ञानिक योगदान यांना प्रोत्साहन देणे आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने आणि विद्यापीठ गीताने झाले. 'जानो अपना देश' प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. शोभा देधिया यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती सर्वांना दिली. 

प्रा. रुबी ओझा, प्र-कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई, प्रा. विलास नांनदवडेकर, कुलसचिव, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई, व पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, श्रीमती राधिका रस्तोगी यांच्या उपस्थितीत  एम.डी.शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, मालाड च्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा, मनीबेन नानावटी वोमेंस कॉलेज, विलेपार्ले च्या प्राचार्या डॉ. राजश्री त्रिवेदी, एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एससीबी कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, चर्चगेट च्या प्राचार्या डॉ. वंदना शर्मा व  आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग,एसएनडीटी मुंबई चे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांच्यात हा सामंजस्य करार 3 ऑक्टोबर, 2023 रोजी मुंबई येथे 'जानो अपना देश' या प्रकल्पांतर्गत उपक्रम राबविण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संबंधित/संलग्नित/संलग्नित संस्थांनी केला आहे.

या कार्यक्रमाला पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, श्रीमती राधिका रस्तोगी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि डॉ. शोभा देधीया, अधिष्ठाता, वाणिज्य व्यवस्थापन, एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई व जानो अपना देश च्या समन्वयक या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या. विद्यापीठातील इतर अधिकारी देखील या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ. वंदना शर्मा यांनी केले.
 

 

Launch of the Project - Jaano Apna Desh, SNDTWU