एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन
शैक्षणिक वर्ष 2022 - 23 या वर्षातील एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, रोड रेस, हँडबॉल व रस्सीखेच इ. क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 7,8, 9 व 10 ऑक्टोबर 2022 रोजी श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई कन्या महाविद्यालय पेठ वडगाव कोल्हापूर या ठिकाणी करण्यात येत आहे. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 25 महाविद्यालयांचा सहभाग असणार असून या स्पर्धेमध्ये एकूण 700 खेळाडू, 60 संघ व्यवस्थापक व संघ मार्गदर्शक व 100 पंच सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 रोजी सायंकाळी 3.30 वाजता होणार असून उद्घाटन प्रसंगी एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक, डॉ सुभाष वाघमारे व समन्वयक श्रीम बिना पंड्या तसेच संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री जयकुमार देसाई, अध्यक्षा मा. श्रीम. शिवानीताई देसाई, चेअरम मंजिरीताई देसाई, युवा नेते मा दौलतराव देसाई, मा श्री बाळ डेळेकर, समन्वयक मा श्री अमोल पाटील, प्राचार्य डॉ. एस के दाभाडे,सहाय्यक श्री नितीन पाटील व वडगाव विद्यालय वडगाव शाळेचे मुख्याध्यापक डी के पाटील उपस्थित राहणार आहेत.
यजमान श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई कन्या महाविद्यालयाने क्रीडांगण व्यवस्था ,सर्व खेळाडू संघ, व्यवस्थापक संघ, मार्गदर्शक यांची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था अत्यंत उत्कृष्टपणे करण्याचे आयोजन केले आहे असे सी. बी. शहा महाविद्यालयातील स्पोर्ट्स विभागाचे प्राध्यापक डॉ दीपक राऊत यांनी सांगितले.
सदर उपक्रमाला एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू मा. उज्वला चक्रदेव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत