|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

मराठी मुद्रितशोधन

मराठी मुद्रितशोधन
About Course मराठी भाषेच्या दैनंदिन वापरासोबत तिचा औपचारिक उपयोग अनेक ठिकाणी होत असतो. मराठीतील विविध प्रसारमाध्यमे (मुद्रित, श्राव्य, दृकश्राव्य), मराठीतील मनोरंजनाची माध्यमे, शासकीय कामकाज, प्रकाशन संस्था, शैक्षणिक कामे इत्यादी अनेक क्षेत्रांची उदाहरणे याबाबत देता येतील. शुद्ध मराठी भाषेची गरज या सर्व क्षेत्रात आहे. शुद्ध मराठी भाषेची जाण असणारी व्यक्ती अशा क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक असतात. अशा क्षेत्रांमध्ये मुद्रितशोधनाचे काम करता येण्यासाठी प्रस्तुत अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे.